जळगाव

अन् क्षणात होत्याच नव्हतं! तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पाच दिवसांवर आलं होतं लग्न…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश याचा २५ एप्रिल रोजी विवाह होणार होता. बुधवारी सकाळी भावेश गावात राहणारे त्याचे काका ज्ञानेश्वर महाजन यांच्याकडे गेला. नाश्ता करायला जात असल्याचे सांगत भावेश काकांची दुचाकी घेवून गेला. बराच वेळ उलटूनही भावेश परत न आल्याने ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो अद्याप घरी आला नसल्याचे भावेशच्या आई वडिलांनी सांगितले.

त्यानंतर सर्वांनी भावेशचा शोध सुरु केला. शोध घेत असताना भावेश धरणगाव रस्त्यावरील सुनील पाटील यांच्या विहिरीत पडल्याचे समजले. त्यानंतर भावेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. भावेशला विहिरीतून बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

6 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago