महाराष्ट्र

वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी फ्रान्सला जाणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई : फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणाऱ्या 19 व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-2022’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज संबंधित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी आज मुंबई येथे मंत्री श्री.केदार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भेट घेणाऱ्यांमध्ये आर्यन दवंडे, मानस मनकवले, निशांत करंदीकर आणि सानिका अत्तरदे या चार खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेसाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पुणे येथे मार्च 2022 मध्ये निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या राज्यातून जिम्नॅस्टिकचे 21 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील आर्यन, मानस, निशांत व सानिका हे चार आणि सलोनी दादरकर हिच्यासह एकूण पाच खेळाडूंचा भारतीय संघात समावेश झाला आहे. या स्पर्धेच्या इतर विविध क्रीडा प्रकारांत राज्यातील एकूण 37 खेळाडूंची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आता नॉर्मंडी येथे 14 ते 22 मे 2022 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत 70 देशांतील विविध क्रीडा प्रकारांत एकूण 3 हजार 500 खेळाडू सहभाग घेणार आहेत.

ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुलात वयाच्या चौथ्या वर्षापासून आर्यन व मानस आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिकचा सराव करीत आहेत. दोघांच्या पालकांची बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. त्यात प्रशिक्षक महेंद्र बाभूळकर यांचेही मोलाचे योगदान आहे. आर्यन दहावीत; तर मानस अकरावीत शिकत आहे. या दोघांनी यापूर्वीदेखील विविध स्पर्धेत पारितोषिके पटकविली आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे गेल्यावर्षी त्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago