महाराष्ट्र

धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान

परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीन पिकाचं नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचे या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.

शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago