commits suicide
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह असल्याचं समजतंय. त्यांचं वय ५० च्या आसपास असून ते जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंह गेल्या काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. टिकरी सीमेवर शहराच्या बायपास रोडवरील एका नव्या बसस्टँडजवळ झाडाला गळफास घेत कर्मवीर यांनी आत्महत्या केली. रविवारी सकाळी कर्मवीर सिंह यांचा मृतदेह काही शेतकऱ्यांच्या नजरेस पडला. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळली. सुसाईड नोटमध्ये ‘भारतीय किसान युनियन जिंदाबाद’ असं म्हटलं आहे. हे काळे कायदे कधी रद्द होतील, याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. हे काळे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असंही त्यांनी पत्रात म्हटलं. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे कर्मवीर दरियाव सिंह हे गेल्या काही दिवसांपासून दुःखी होते, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
शेतकऱ्यांनी या घटनेची सूचना पोलिसांना देताच पोलीस लगेचच घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसंच या घटनेची माहिती मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…