t20 world cup 2022 begins today full schedule match timing live streaming details
पुणे : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत पाहायला मिळणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धेत 16 संघामध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. टी 20 विश्वचषकातील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक
पहिली फेरी : क्वालीफाइंग राउंड
दुसरी फेरी : सुपर 12
तुम्हाला टी20 वर्ल्ड कप मॅच थिएटरमध्ये लाईव्ह पाहता येणार आहे. आयनॉक्स मल्टीप्लेक्सने आयसीसीसोबत करार केला आहे. यामुळे आयनॉक्स थिएटरमध्ये तुम्हाला टी 20 वर्ल्ड कप सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. वर्ल्ड कपमधील भारताचे सर्व सर्व सामने आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये तुम्हाला लाईव्ह पाहता येतील. देशभरातील आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…