Death of younger sibling while playing in the field
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. बहीण- भाऊ शेतात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शेतातील तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहते. काळ संध्याकाळच्या सुमारास या चिमुकल्यांचे आई- वडील शेतात काम करत होते आणि शीतल शैलेश कुमरे (वय 5) व शिवम शैलेश कुमरे (वय 3) ही भावंडं शेतातील परिसरात असलेल्या तलावाजवळ खेळत होती. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने आई- वडिलांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले.
घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत समुद्रपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…