बीड

अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली.

दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर तपासासाठी 8 जणांची टीम तयार करण्यात आल्याचे रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मेटे यांच्या कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा अपघात होता की घातपात, याची चौकशी करावी, अशी मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे बाळासाहेब खैरे पाटील यांनी केली.

रविवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. मराठा मोर्चाचे समन्वयक तसेच प्रमुख नेत्यांना बैठकीचे आमंत्रण होते. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बीड येथून निघाले. ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्याजवळ आले असता त्यांच्या कारचालकाचा ताबा सुटल्याने कार भरधाव ट्रकला धडकली. महामार्ग पाेलिसांनी त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार रुग्णालयात गेले. संभाजीराजे छत्रपती, प्रवीण दरेकर यांच्यासह मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago