Arnab accused of being beaten by police
मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्यावर आज सकाळी पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. अटक करतेवेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.
अर्णब गोस्वामी यांचे आरोप :
अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब यांच्यावर कारवाई केली आहे. कारवाई करत असताने दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण :
दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…