अहिल्यानगर

शिवसेनेने त्यांच्या मूळ तत्वालाच गुंडाळून ठेवले आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेवर टीका

अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला हिंदुत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदुत्व गुंडाळून ठेवायचे असे चित्र शिवसेनेचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही ते औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे बदलू शकले नाहीत. एकप्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला आहे. मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही. प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही, राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली, त्या मूळ हिंदूत्वाच्या तत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही व औवेसींसारख्या लोकांनी त्यांचे गोडवे गायले तर तो सरकारचा तारणहार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असेही विखे पाटील पुढे म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago