Kerala model-actor found dead at her residence
केरळ : केरळमधील कोझिकोड येथील 20 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाना गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. शहानाचा पती सज्जाद (३१) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोझिकोड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या पारंबिल बाजार येथील राहत्या घरी शहाना खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तरुण मॉडेलच्या मृत्यूच्या आजूबाजूच्या रहस्यमय परिस्थितीमुळे संशय निर्माण झाला आहे.
शहानाची आई उवेमा यांनी सांगितले कि, “शहानाने गुरुवारी संध्याकाळी आमच्याशी संपर्क साधला होता. तिचा 20 वा वाढदिवस होता. तिने सांगितले होते की ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी येणार आहे. ती खूप आनंदी होती. मला वाटत नाही की तिने आत्महत्या केली आहे.” शहानाची हत्या पती सज्जादने केल्याचा आरोप उवेमा यांनी केला आहे. एका जाहिरातीसाठी मिळालेला चेक देण्यास नकार दिल्यानंतर सज्जादने शहानाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला.
शहानाने दीड वर्षापूर्वी कोझिकोडा येथील रहिवासी सज्जादशी लग्न केले होते. जेव्हा दोघांनी लग्न केले, तेव्हा सज्जाद कतारमध्ये काम करत होता. शहानाने लग्नानंतर मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती आणि ती तमिळ चित्रपटातही काम करायची. शहानाने भरपूर पैसे कमवायला सुरुवात केल्यानंतर सज्जादने कतारला परतण्यास नकार दिल्याचा दावा उवेमाने केला. तिने कमावलेले बरेचसे पैसेही त्याने खर्च केले. सज्जादच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून २५ सोन्याचे दागिने मागितल्याचा आरोपही शहानाच्या नातेवाईकांनी केला आहे. लग्नानंतरही सज्जादने हुंड्यासाठी शहानाच्या कुटुंबियांचा छळ केला. शिवाय, सज्जाद आणि त्याच्या कुटुंबीयांनी शहानाच्या आईला तिला भेटू देण्यास नकार दिला.
तरुण मॉडेल तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यानंतर, केरळ पोलिसांनी सज्जादला ताब्यात घेतले आहे. शहानाच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि हत्येसह विविध आरोप लावले आहेत. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…