नाशिक

एकलहरे औष्णिक केंद्राचे बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून कायापालट करा, नितीन राऊत यांच्या सूचना

नाशिक : एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे ‘बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये’ रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल याचा विचार विजेची कामे करताना करा. तसेच पावसाळ्यापूर्वी थर्मल पावर स्टेशन कार्यान्वित करा. वीज प्रकल्प येथील राखेला मागणी असून नियमानुसार राखेचे वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच एकलहरेतील मंजूर ६६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत लवकरच सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले . यावेळी त्यांनी वीज निर्मिती केंद्राची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

नाशिकच्या एकलहरे, औष्णिक विद्युत केंद्र येथे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभागाचा आढावा काल संध्याकाळी (१२ मे, २०२२) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, महाजनकोचे कार्यकारी संचालक आर. जी. मोराळे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता एन. एम. शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता डी. ए. कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, विद्युत निरीक्षक बी. के. उगले व तीनही कंपन्यांचे अभियंते व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago