पुणे : आपल्या जोडीदाराशी आपले नाते चांगले असावे, असे आपल्याला नेहमी वाटते. परंतु, त्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि मनापासून प्रयत्न करायला हवे. पती-पत्नीने एकमेकांबद्दल प्रेमाने बोलावे, प्रेम व्यक्त करावे, मनमोकळेपणाने आपल्या भावना एकमेकांसमोर मांडाव्यात. पती-पत्नीचे नाते सर्वात मजबूत मानले जाते. परंतु, पती-पत्नी दोघांचीही अशी अपेक्षा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा. आपल्या भावना आणि मन समजून घ्यावे.
तुमचे नाते कसे आहे? येथे काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. खाली नमूद केलेल्या गोष्टी तुमच्या नात्यात जिवंत असतील तर समजून घ्या की तुमच्या दोघांचे परस्पर नाते मजबूत, चांगले आणि अतूट आहे.
मनातल्या गोष्टी एकमेकांना निसंकोचपणे सांगा : पती-पत्नीचे नाते तेव्हा अप्रतिम बनते जेव्हा दोघेही बिनधास्तपणे एकमेकांशी मनापासून बोलायला शिकतात.
अनेकदा बहुतेक स्त्रियांना आपल्या मनातलं बोलायचं असतं, फिरायला जायचं असतं, आवडता चित्रपट बघायचा असतो, पूर्वीसारखंच खास ठिकाणी जायचं असतं, परंतु, त्या याबद्दल सांगण्यात संकोच करतात. तर काही पतीही त्यांच्या भावना, किंवा पत्नीसोबत वेळ घालवण्यात रस दाखवत नाहीत. या कारणामुळे पती-पत्नीमधील संबंध बिघडतात. बहुतेक जोडप्यांना काही वर्षांनी नीरस जीवन जगण्याची सवय लागते. किंबहुना, संसारात पडल्यानंतर ते रोजच्या जीवनात व्यग्र असल्याची सबब पुढे करत राहतात. कालांतराने त्यांच्यातील हलकाफुलका रोमान्सही संपून जातो. याचा परिणाम असा होतो की दोघांनाही इच्छा असूनही एकमेकांशी समाधानकारक संबंध राखता येत नाहीत. एक अपूर्णता कायमच राहते. गैरसमज वाढतात. त्यामुळे जरा विचार करा आणि दोघांमधील संकोच दूर करा. मग आयुष्य खूप सुंदर होईल.
एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या
पती-पत्नी यांनी एकमेकांच्या भावना जपल्या पाहिजेत. हे ऐकायला किंवा वाचायला महत्त्वाचे वाटत नसेल. पण भावनांचा आदर नसेल तर नात्यात कधी दुरावा निर्माण होतो हे कळत नाही. पती-पत्नी या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहतात. एकमेकांच्या भावना जपल्या तर पती-पत्नीतील नाते आणखी घट्ट होते. दोघांच्या आवडीनिवडी, विचारसरणी, जीवनशैली इत्यादींमध्ये नक्कीच काही फरक आहे. म्हणूनच एकमेकांच्या भावना समजून घेऊन एकमेकांना आधार दिला पाहिजे. असे केल्याने जोडप्यांमधील प्रेम अधिक घट्ट होते.
जोडीदाराच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा आदर करा
तुमच्या जोडीदाराच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा आदर जरूर करा. जर तुम्ही एकमेकांच्या नातेवाईकांचा आदर केला तर तुमचा एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. आणि हो! जर तुमच्यासोबत कोणी चुकीचे वर्तन करत असेल तर तुमच्या जोडीदाराला नक्की सांगा. जेणेकरून नंतर अशा लोकांमुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागू नये. अशा वेळी पती-पत्नीच्या परस्पर सामंजस्याने तोडगा काढता येतो. जेव्हा दोघांमध्ये परस्पर स्नेह, आदर आणि समर्पण असेल तेव्हाच पती-पत्नीचे हे नाते पुढे जाऊ शकते.
भांडण झाल्यास एकमेकांना मनवण्याचा प्रयत्न करा
पती-पत्नीमध्ये भांडण होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण थोडे भांडण झाले तरी एकमेकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणे ही खास गोष्ट आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय जगणे कठीण आहे. पती-पत्नीमधील प्रेम सारखेच असले पाहिजे. जर पती-पत्नीमध्ये गाढ प्रेम असेल, तर काही तासांच्या भांडणानंतर त्यांना एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटते. त्यांना आपोआपच त्यांची चूक कळू लागते आणि ते एकमेकांना पटवून देण्याच्या मार्गांचाही विचार करू लागतात. याचा परिणाम असा होतो की असे पती-पत्नी एकमेकांवर जास्त काळ रागावू शकत नाहीत.
जोडीदारावर नेहमी तसेच प्रेम करा, जसे सुरुवातीला होते
लग्नानंतर शारीरिक स्थितीत नक्कीच बदल होतो. संसारात पडल्यानंतर अनेक गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात. परंतु, काहीही झालं तरी आपल्या जोडीदारावर असलेलं आपलं प्रेम तसंच राहणं आवश्यक असतं. काही जोडप्यांची खासियत असते, त्यांच्यात कितीही शारीरिक बदल झाला तरी त्यांना त्यांचा जोडीदार नेहमी प्रिय असतो. हे तेव्हाच घडते जेव्हा पती-पत्नी एकमेकांच्या प्रेमात असतात आणि लग्नाच्या काही वर्षानंतरही एकमेकांची तशीच काळजी घेतात, जशी ते पूर्वी घ्यायचे.
नात्यात छोट्या-छोट्या गोष्टी महत्वाच्या
पती-पत्नीने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की नात्यात छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पती-पत्नी अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते त्यांचा पार्टनर स्वतःची काळजी घेईल. पण आपण जोडीदाराची काळजी घेतली तर या गोष्टी थेट तुमच्या जोडीदाराच्या मनावर परिणाम करतात, आणि त्यांचे तुमच्यावरील प्रेम आणि विश्वास दृढ होतो. आयुष्यात सुख-दु:ख येतात, चढ-उतार येतात आणि जातात. पण काही जोडपी मोठ्या उत्साहाने राहतात. ते एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. ते प्रेमाच्या बंधनात इतके घट्ट जोडले जातात की त्यांना तणावासाठी वेळच उरत नाही. एकमेकांसोबत वेळ घालवताना त्यांना त्यांच्याच छोट्याशा जगात मोठा आनंद मिळतो.
नात्यात संतुलन
पती-पत्नीमध्ये प्रेम असेल तर नात्यात समतोल राहतो. ही कला पती-पत्नीपेक्षा चांगली कोणीही जाणू शकत नाही. पती-पत्नीच्या आजूबाजूला अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे त्यांच्यातील समन्वय बिघडण्याचा धोका असतो. पण एकमेकांवर खरे प्रेम करणारी जोडपी सर्व अडचणींना पार करून आनंदी जीवन जगतात. अशा जोडप्यांचे नाते घट्ट होते आणि इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनते.
एकमेकांशी चांगले वागा
एकमेकांमध्ये कितीही भांडणं झाली तरी एकमेकांशी चांगले वागा. तसेच भांडणं मिटल्यानंतर मनात काहीही ठेवू नका. अनेकदा एकमेकांशी भांडण करताना, काहीजण एकमेकांशी खूप वाईट वर्तन करतात. भांडणात आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. काहीजण आपल्या जोडीदाराच्या आत्मसन्मानाची काळजी न घेता इतरांसमोर त्यांचा अपमान करण्याची संधी सोडत नाहीत. हे नात्यासाठी फारच घातक ठरते.
एकमेकांवर विश्वास ठेवा
पती-पत्नीच्या नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणे. त्यांच्यातील विश्वासाचे बंध जितके मजबूत असतील तितके त्यांचे प्रेम अधिक मजबूत होईल. कारण लग्नानंतर नवीन आयुष्य सुरू होते. अशी दोन माणसे गाठ बांधतात ज्यांना एकमेकांबद्दल काहीच माहिती नाही. त्यांचे विचार, छंद, जीवनशैली, नातेसंबंधांप्रती विचार काय आहेत, हे कळायलाही वेळ लागतो. अशा वेळी पती-पत्नीचे नाते टिकवण्यासाठी फक्त विश्वास हवा.
जुन्या गोष्टी उगाळू नका : अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण झाले की ते जुन्या गोष्टी उगाळू लागतात. पण त्यामुळे भांडण आणखीनच वाढत जाते. अशा गोष्टी लक्षात ठेवल्याने परस्पर विसंवाद वाढतो. त्या विसरण्यातच शहाणपण आहे.
आपल्या समस्या जोडीदारासोबत शेयर करा
पती-पत्नीचे नाते हे केवळ सुखात नाही तर दु:खातही साथ देणारे असते. तरीही, अनेकजण अडचणीत असताना जोडीदाराला काहीही सांगत नाहीत. जर तुम्ही तुमची समस्या पार्टनरसोबत शेअर केली तर दोघे मिळून ही समस्या सोडवू शकतात. यामुळे दोघांमधील नाते आणखी घट्ट होईल. दोघांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल.
एकमेकांना वेळ द्या
आजकालच्या धावपळीच्या जीवनात जोडपी एकमेकांसाठी मनापासून वेळ द्यायला विसरतात. याचा परिणाम असा होतो की काही वर्षांनी त्यांच्यातील नाते निस्तेज भासू लागते. म्हणूनच पती-पत्नीने एकमेकांसाठी खास वेळ काढायला हवा. शक्य असल्यास फिरायला जा. असे केल्याने, तुमच्यातील संबंध नवीन उत्साहाने अधिक दृढ होऊ लागतील.
स्तुती आणि माफी मनापासून असावी
पती-पत्नीचे नाते असे असावे की एकमेकांची मनापासून स्तुती करावी, तसेच एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल तर मनापासून माफी मागावी. पती-पत्नीमध्ये विभक्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे भांडणं झाल्यास माफी मागायला दोघांचे इगो मध्ये येतात. कोणीही पहिल्यांदा पुढे जाऊन बोलत नाही. परिणामी, हा अहंकार त्यांच्या नात्याच्या तुटण्याचे मुख्य कारण बनतो.
एकमेकांपासून दूर गेल्यावर आठवण येणे
जर पती-पत्नीमध्ये अतूट प्रेम असेल, तर एकमेकांपासून दूर गेल्यावर त्यांना एकमेकांची खूप आठवण येते. नाते घट्ट असेल तर ते दूर असताना सर्व मतभेद विसरून एकमेकांना भेटण्यास उत्सुक असतात. एकमेकांशिवाय त्यांना कुठेही राहावंसं वाटत नाही. असे असणे हे पती-पत्नीच्या अतूट नात्याचे वैशिष्ट्य आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…