Veteran actor Yusuf Hussain dies of corona
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 73 वर्षांचे होते. युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हंसल मेहता यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. हुसेन हे निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते.
युसूफ हुसेन यांचे जावई हंसल मेहता यांनी ट्विटर वर आपल्या सासऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी लिहिलं की, जेव्हा ते आर्थिक तंगीचा सामना करत होते. त्यांचं करिअर जवळपास संपलं होतं, त्यावेळी हुसेन यांनी खूप मदत केली. मेहता यांच्याकडे शाहिद बनवण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी यूसुफ हुसेन यांनी तात्काळ एक चेक साइन करुन मदत केली होती. त्यानंतरच सिनेमाचं काम पूर्ण झालं.
युसुफ हुसेन यांनी दिल चाहता है, विवाह, धूम 2, क्रिश 3, ओम माय गॉड, शाहिद, रईस, रोड टू संगम अशा अनेक सिनेमांमध्ये चरित्र अभिनेते म्हणून काम केलं आहे. सोबतच त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…