क्राईम

भयंकर कृत्य! महिलेने तीन किलो साखर घालून उकळलेले पाणी नवऱ्याच्या अंगावर फेकले, आणि…

इंग्लंड : एका महिलेने आपल्या 81 वर्षीय पतीवर साखर घालून उकळलेले पाणी ओतले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 59 वर्षीय महिलेचे नाव कोरीना बेन्स आहे. ही महिला एका किरकोळ कारणावरून नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यातून तिने हे भयंकर कृत्य केले. आता या प्रकरणात कोरीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय कोरीना बेन्स या महिलेचा 38 वर्षांपूर्वी मायकल बेन्स यांच्याशी विवाह झालेला होता. दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी (13 जुलै 2020) कोरीना आपल्या मुलीबरोबर शॉपिंगसाठी गेली होती. परंतु, तिच्या नवऱ्याने तिला लवकर घरी बोलावून घेतले. त्यावरून कोरीना आपल्या नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यावेळी कोरीना काहीही बोलली नाही, पण तिला आपल्या नवऱ्याचा खूप राग आला होता. त्यामुळे तिने तिचा नवरा झोपी गेल्यानंतर पाणी उकळून त्यात तीन किलो साखर टाकली. हे गरम मिश्रण एका बादलीत ओतले. त्यानंतर या महिलेने हे उकळते पाणी झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर फेकले. यामध्ये मायकल बेन्स यांचे शरीर ३६% भाजले.

डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर पॉल ह्यूजेस यांनी सांगितले कि, “कोरीनाने तिच्या नवऱ्याच्या अंगावर फक्त उकळते पाणी फेकले नाही, तर त्यात तीन किलो साखरही मिसळली होती. उकळत्या पाण्यात साखर टाकल्यानंतर हे मिश्रण खूपच प्राणघातक होते. हे मिश्रण खूप घट्ट आणि चिकट होते आणि त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. यातून या महिलेला आपल्या पतीला किती वेदना द्यायच्या होत्या याची कल्पना येते. ते पुढे म्हणाले की, या महिलेने हल्ला केल्यानंतर रुग्णवाहिका बोलावली नाही. त्याऐवजी ही महिला काही अंतरावर राहणाऱ्या एका शेजार्‍यांकडे गेली. तिथे जाऊन ती म्हणाली कि, “मी माझ्या नवऱ्याला नुकसान पोहोचवले आहे, कदाचित मी त्याला मारून टाकले आहे.” त्यानंतर शेजाऱ्यांनी घाबरुन तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना कॉल केला.

लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात घातल्या गोळ्या, नंतर क्रेनने लटकवले मृतदेह..

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मायकल बेन्स बेडवर विव्हळत पडलेले होते, त्यांना खूप वेदना होत होत्या. त्यांच्या शरीराचा एक तृतीयांश भाग भाजला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरीनाने हत्येची कबुली दिली. न्यायालयाकडून कोरीनाला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago