massive explosion in a firecracker factory sound heard up to 5 km away
पालघर : पालघरच्या डहाणू तालुक्यातील देहाणे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज ५ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. तर, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना या स्फोटामुळे मोठे धक्के जाणवले. कारखान्यातून निघणारा धूर कित्येक किलोमीटर अंतरावरही दिसंत आहे. डहाणू महामार्गापासून 15 कि.मी. अंतरावर जंगल परिसरात हा कारखाना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘विशाल फायर वर्क्स’ नावाच्या फटाका कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्फोटात दहा जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार व काही अधिकारी दाखल झाले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…