The bomb of World War II detonated eight decades later
लंडन : इंग्लंडच्या एक्स्टर शहरात तब्बल आठ दशकांनंतर दुसर्या महायुद्धातील बॉम्ब आढळला. त्यानंतर इंग्लंडमधील एक्स्टर शहर रिकामे करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धातील या महाविनाशक बॉम्बला रविवारी निकामी करण्यात आले. रिमोट कंट्रोल द्वारे या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही किलोमीटर दूरपर्यंत असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
या बॉम्बची माहिती मिळताच, घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. विद्यापीठातील १४०० विद्यार्थ्यांसह ग्लेनहॉर्न रोड भागातील जवळपास २६०० घरांतील नागरिकांना शुक्रवारी आणि शनिवारी या भागातून दूर जाण्यास सांगितले. रविवारी सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी हा बॉम्ब निकामी करण्यात आला. यासाठी नियंत्रित स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाचा आवाज १० किमी पर्यंत ऐकू आल्याची माहिती आहे.
हा बॉम्ब हिटलरच्या नाझी सैन्याने ब्रिटनच्या एक्स्टर शहरावर डागला होता, असे म्हटले जाते. एक्स्टर विद्यापीठाच्या परिसरात हा बॉम्ब आढळून आला. या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉयल नेव्ही बॉम्ब डिस्पोजल टीमच्या तज्ज्ञांनी नियंत्रित पद्धतीने हा स्फोट घडवून आणला.
दरम्यान, निवासी भागात ९०० किलो वजनाचा बॉम्ब सापडल्यानंतर आसपासच्या भागातही शोधमोहीम सुरु आहे. ब्रिटीश सुरक्षा संस्थांचा या भागात आणखी जिवंत बॉम्ब सापडतील असा अंदाज आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…