महाराष्ट्र

मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये होता चीनचा सहभाग, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये दावा

मुंबई : मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा सहभाग होता. हा दावा अमेरिकेतील एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चीनच्या सायबर अटॅकमुळे तेव्हा मुंबईत पॉवर कट झाला होता. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात तो घातपातच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तास प्रयत्न केल्यानंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे घातपाताचा संशय देखील त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अ‍ॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी झाला होता. मात्र या मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही वृत्तात म्हटलं आहे. वीजपुरठ्यातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करुन १० ठिकाणचे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय भारतामधील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही हल्ला करण्यात आल्याचं दिसून आलं.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं कि, “राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago