महाराष्ट्र

पर्यटनाची आवड असेल तर होऊ शकता टुरिस्ट गाईड, सरकार देत आहे सुवर्णसंधी

मुंबई : पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून, आपल्या सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी व इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमांसोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये असून परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १ हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी आणि वर्तन कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येईल. आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर “महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक” अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२-६२९४८८१७ वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago