ग्लोबल

मोठी बातमी : फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर सुरू केल्या कोरोना लसीच्या ट्रायल

अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात काही निरोगी मुलांना कोरोना लस दिली जाईल. चाचणीसाठी फायझरने जगातील चार देशांतील 4,500 हून अधिक मुलांना निवडले आहे. या चार प्रमुख देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनचा समावेश आहे.

फायझरने याबाबत माहिती देताना सांगितले की, “चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १२ वर्षाखालील मुलांना लस दिली जाईल. जर सर्व काही ठीक झाले तर ही चाचणी पुढे सुरु राहील. कंपनीने पुढे म्हटले की लसीकरणाच्या चाचणीसाठी या आठवड्यात 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना निवडण्याचे काम सुरू केले जाईल. या मुलांना १० मायक्रोग्रामचे दोन डोस दिले जातील. हा डोस प्रौढ आणि वृद्धांना देण्यात येणाऱ्या डोसच्या एक तृतीयांश आहे. यानंतर काही आठवड्यात 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली जाईल. त्यांना तीन मायक्रोग्राम लस दिली जाईल.

वृत्तानुसार, फायझरशिवाय मॉडर्ना देखील 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेत आहे. त्याचे निकालही लवकरच बाहेर येऊ शकतात. तसेच, जॉन्सन आणि जॉन्सनकडून अभ्यास केले जात आहेत. गेल्या महिन्यात, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर यूकेमध्ये अभ्यास सुरू केला. या सर्व कंपन्यांना लवकरच सकारात्मक निकाल मिळण्याची आशा आहे.

चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

6 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 आठवडे ago