ग्लोबल

चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता

बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे.

चीनची सरकारी कंपनी सिनोफर्म यांनीही किशोरवयीन मुलांसाठी लसीसाठी परवानगी मागितली आहे. सिनोफर्म लसीसाठी सिनोव्हॅकसारखेच तंत्रज्ञान वापरत आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्स ही आणखी एक कंपनी 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस तयार करत आहे. त्याचे तंत्रज्ञान सिनोव्हॅकपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या लसीच्या दुसर्‍या टप्प्याची चाचणी घेण्यात येत आहे.

सिनोव्हॅकने दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यादेखील पूर्ण केल्या आहेत. चाचणी दरम्यान, सहभागींना लसीचे दोन नियमित डोस दिले गेले. यानंतर तिसरा बूस्टर डोस देण्यात आला. यादरम्यान, पूर्वीपेक्षा अँटीबॉडीजची पातळी 10 आणि 15 दिवसांनी 20 पट वाढल्याची दिसली. तथापि, कंपनीला अद्याप अँटीबॉडी कालावधीचा दीर्घकालीन आढावा घेणे आवश्यक आहे.

सिनोव्हॅक बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यिन वेइदोंग यांनी सांगितले की चाचणीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात हजारो जणांनी सहभाग घेतला होता. प्रौढांप्रमाणे मुलांसाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले. त्यामुळे तीन ते 17 वयोगटातील मुलांसाठी समान लस, समान डोस आणि समान प्रक्रिया वापरली जाऊ शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago