देश

इन्स्टाग्रामविरुद्ध तक्रार दाखल, स्टिकरमध्ये भगवान शिव यांच्या हातात वाइनचा ग्लास

नवी दिल्ली : भारतात सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वाद सुरु आहेत. त्यातच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम बाबत एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने इन्स्टाग्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवर भगवान शिव यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी आहे.

भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या संसद पथ पोलिस स्टेशनमध्ये इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की इंस्टाग्रामवर शिव कीवर्ड सर्च केल्यावर भगवान शिव यांचे चित्र चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत आहे. येथे एक स्टिकर आहे, ज्यामध्ये भगवान शिव यांच्या हातात एक वाइनचा ग्लास आहे, तर दुसर्‍या हातात फोन दाखविला गेला आहे. त्याची काही छायाचित्रे देखील भाजप नेते मनीष सिंह यांनी शेअर केली आहेत.

भारत सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्यात सध्या वाद सुरू आहे. सरकारने आयटीचे नवे नियम लागू केले आहेत, परंतु ट्विटरसह इतर काही प्लॅटफॉर्मने त्यावर आक्षेप घेतला. परंतु, सरकारने ठामपणे सांगितले आहे की प्रत्येकाला भारतीय कायद्याचे पालन करावे लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago