lady gaga recalls painfull sexual assault in oprah winfrey show
जगप्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने ओपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही घटनांचा खुलासा केला आहे. तिने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबद्दल अनेक गोष्टीचे खुलासे केले आहेत.
लेडी गागा ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये आली होती. तिचं खरं नाव स्टीफनी जर्मनोट्टा आहे. या शोमध्ये लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत खळबळजनक खुलासा केला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. ती म्हणाली, ” मी १९ वर्षांची असताना माझ्यावर लैगिंक अत्याचार झाला होता. एक प्रोड्युसर मला म्हणाला, कपडे काढ. मी नाही म्हणाले आणि तिथून निघून जात होते. तेव्हा त्याने माझे सर्व म्युझिक अल्बम जाळून टाकण्याची धमकी दिली आणि तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने मला विचारणं सुरूच ठेवलं. मी एकदम गोठल्यासारखी झाले होते, नंतर काय घडलं मला काही आठवतही नाही.”
लेडी गागाने पुढे सांगितले कि, ”आधी मला असह्य वेदना झाल्या, नंतर मी सुन्न झाले. त्यानंतर अनेक आठवडे मी आजारी होते. मग माझ्या लक्षात आलं, या तशाच वेदना आहेत जेव्हा त्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला आणि मी गरोदर असताना मला एका कोपऱ्यात टाकून दिलं, कारण मी आजारी होते आणि मला उलट्या होत होत्या. माझ्यावर लैगिंक अत्याचार झाला होता. मी काही महिन्यांसाठी एका स्टुडीओत कैद होते.”
ती पुढे म्हणाली, “काही वर्ष मी खूप वेगळी मुलगी होते. माझ्यावर जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी जाणवलेल्या वेदवा मला सतत जाणवत राहिल्या. मी खूप एमआयआर आणि स्कॅन केले पण डॉक्टरांना काहीच आढळून आलं नाही. पण माझ्या शरीराने त्या वेदना भोगल्या होत्या. मला त्यातून बाहेर यायला अडीच वर्ष लागले. आता मी 35 वर्षांची आहे, पण मी कधीही त्या माणसाचे नाव घेणार नाही. मला ही #MeToo चळवळ माहित आहे, मला हे समजले आहे की काही लोकांना यातून खरोखर आरामदायक वाटते आणि मी तसे करीत नाही. मला पुन्हा कधीच त्या व्यक्तीला बघायचं नाही.”
गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…
‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…