brazilian singer mc kevin falls to death
ब्राझील : प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. मात्र, आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. केव्हिन गॅलरीत एका मॉडेलबरोबर रोमान्स करत होता, त्यावेळी अचानक त्याची पत्नी तेथे आली आणि घाबरल्यामुळे केव्हिन पाचव्या मजल्यावरून खाली पडला.
या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वीच केव्हिनने त्याची मैत्रीण डियोलेन बेजेराशी लग्न केले होते. केव्हिन आपल्या पत्नीची फसवणूक करीत होता आणि एका मॉडेलशी संबंध ठेवत होता. परंतु एका अत्यंत विचित्र परिस्थितीत केव्हिनला आपला जीव गमवावा लागला.
केविन त्याचा मित्र व्हिक्टरसोबत ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथी एका हॉटेलमध्ये गेला होता. या हॉटेलमध्ये त्याची भेट 26 वर्षीय मॉडेल बियान्काशी झाली. या सर्वांनी मिळून येथे ड्रग्सचे सेवन केले. त्यानंतर व्हिक्टरने बियांकाला पैशाच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर दिली. तथापि, केव्हिनने हे स्पष्ट केले की त्याने 33 वर्षीय डियोलेनशी लग्न केले आहे, त्यामुळे बियांकाने शरीरसंबंध ठेवल्याची गोष्ट गुप्त ठेवावी. मॉडेल बियांकाने सुरुवातीला यासाठी नकार दिला, परंतु थोड्या वेळाने बियान्का तयार झाली आणि म्हणाली की व्हिक्टर आणि केव्हिन या दोघांना तिला 390-390 डॉलर्स द्यावे लागतील.
प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न
दरम्यान, त्याच हॉटेलमध्ये राहणारी क्रूझ नावाची एक व्यक्ती केव्हिनकडे आली. जेव्हा क्रूझला या ऑफरबद्दल समजले, तेव्हा तो त्याला ऑफरमध्ये सामील करून घ्या, असं म्हणू लागला. तथापि, व्हिक्टर आणि केव्हिन यांनी त्याला पळवून लावले. क्रूझने जाता-जाता केव्हिनच्या सुरक्षा रक्षकाला सांगितले की केव्हिनची पत्नी त्याचा शोध घेत आहे.
केव्हिनची पत्नी डियोलेनही या हॉटेलमध्ये थांबली होती. केव्हिनला याबद्दल माहित नव्हते, परंतु क्रूझला हे माहित होते. यानंतर, केव्हिनच्या सुरक्षा रक्षकाने व्हिक्टरला संदेशही दिला की केव्हिनची पत्नी त्याचा शोध घेत आहे. व्हिक्टरने केव्हिनला याबद्दल सांगितले, परंतु केव्हिनने याकडे दुर्लक्ष केले. काही काळानंतर व्हिक्टर वॉशरूममधून बाहेर येत असताना त्याने पाहिले की केव्हिनची पत्नी त्याच्या खोलीत आली आहे. त्यावेळी केव्हिन बाल्कनीत लटकून स्वत: ला लपविण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु या गोंधळात त्याचा पाय घसरला आणि तो पाचव्या मजल्यावरून थेट खाली पडला.
त्यानंतर केव्हिनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केव्हिनचे इंस्टाग्रामवर 10 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तो सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होता. मात्र, या प्रकरणात बियान्कावर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले कि, “लोक मला जज करीत आहेत, परंतु त्यांना हे समजले पाहिजे की मी केव्हिनकडे गेले नव्हते तर केव्हिन माझ्याकडे आला होता. कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणेच, या घटनेनंतर मलाही धक्का बसला आहे.”
Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल
ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…