महाराष्ट्र

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अरबी समुद्रात पी -305 जहाज बुडाले आणि त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जहाजाच्या कॅप्टनसह अनेक व्यक्तींविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. पोलिसांनी कॅप्टन राकेश बल्लभ आणि इतरांविरूद्ध कलम 3०4 (२), 38 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात सोमवारी तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पाण्यात बुडालेल्या जहाजाचे मुख्य अभियंता रहमान शेख यांनी आरोप केला की, बार्ज पी -305 (P-305 barge) च्या कॅप्टनने चक्रीवादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नाही, ज्यामुळे चालक दलातील कमीतकमी 49 जणांचा मृत्यू झाला. रहमान यांनी बार्ज पी -305 चा प्रवास योग्य होता का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, कॅप्टन बलविंदर सिंग यांनी जोर देत म्हटले की वारा जास्त वेगाने वाहणार नाही, वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपेक्षा जास्त होणार नाही. तसेच चक्रीवादळ फक्त तासभरच असेल. ते 11 वाजता सुरू होईल आणि 12 वाजता संपेल. ही संपूर्ण घटना कॅप्टन आणि ग्राहक (क्लायंट) यांच्यामुळे घडली आहे.

ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता

या घटनेतील २६ जण अद्याप बेपत्ता आहेत, त्यांच्यामध्ये बलविंदरसिंग हेदेखील आहेत. रहमान शेख हेदेखील 24 तास पाण्यात राहिले, त्यानंतर नौदलाने येऊन त्यांना वाचवले. P-305 या बार्जवर 261 लोक होते. चार दिवसांपूर्वी अरबी समुद्रात पी 305 बार्ज बुडाले, गुरुवारपर्यंत ठार झालेल्या लोकांची संख्या 49 वर गेली होती. 26 लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाचे शोध आणि बचाव कार्य चालू आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago