ग्लोबल

सोन्याच्या खाणीजवळ व्हिडिओ शूट करताना 8 मॉडेलवर सामूहिक बलात्कार, 84 जणांना अटक

केपटाऊन : अवैध सोन्याच्या खाणीजवळ म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करणाऱ्या आठ मॉडेल्सना एका टोळीने पकडले. त्यानंतर या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत या 8 मॉडेलवर सामूहिक बलात्कार केला. या जघन्य गुन्ह्यानंतर याप्रकरणी 84 जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत 28 जुलै रोजी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी जोहान्सबर्गजवळील क्रुगर्सडॉर्प येथील जंगलात एक प्रॉडक्शन टीम म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी गेली होती. यादरम्यान ही घटना घडली. या टोळीने या महिला आणि कर्मचाऱ्यांचे सर्व सामानही काढून घेतले. या टोळीने कर्मचारी आणि मुलींचे मोबाईल फोन, अंगठ्या, दागिने, हँडबॅग, रोख रक्कम आणि कॅमेरा हे सामानही पद्धतशीरपणे लुटले.

पोलीस म्हणाले की, क्रुगर्सडॉर्पमध्ये जे काही घडले ते संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे आहे. या घटनेमागे खाणींमध्ये काम करणाऱ्या अवैध स्थलांतरितांचा हात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी 84 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन आरोपी मारले गेले. एक आरोपी गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटक केलेल्यांविरुद्ध बेकायदेशीर मुक्काम व चोरीचा खटला न्यायालयात सुरू आहे.

राष्ट्रीय पोलीस प्रमुख फॅनी मासेमोला यांनी सांगितले की, संशयितांचा बलात्काराशी संबंध आहे की नाही याची चौकशी केली जाईल. मात्र, अद्यापपर्यंत सामूहिक बलात्कार प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago