देश

ब्रेकिंग! दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला

दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. येथे एका नायजेरियन व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नायजेरियातील ही दुसरी व्यक्ती आहे ज्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये UAE मधून परतलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीला आज मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी सांगितले की, त्याच्यावर मलप्पुरम जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्या व्यक्तीचे पालक आणि त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

14 जुलै रोजी कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि गेल्या आठवड्यात रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. कन्नूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी संसर्गाचा दुसरा आणि शेजारच्या मलप्पुरममध्ये 22 जुलै रोजी तिसरा रुग्ण आढळून आला. हे सर्वजण परदेशातून परतले होते. केरळ सरकारने सोमवारी सांगितले की, 30 जुलै रोजी मरण पावलेल्या 22 वर्षीय तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. मंकीपॉक्समुळे झालेला हा देशातील पहिला मृत्यू होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

3 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago