मनोरंजन

विद्या बालनचा चित्रपट ‘शेरनी’चा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा पुढील चित्रपट ‘शेरनी’चा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. विद्याचे चाहते जवळपास एक वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना उत्साहित केले आहे.

न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे, ज्याद्वारे विद्या एका वन-अधिकाऱ्याचा प्रवास दाखवणार आहे, जी मानव आणि प्राणी यांच्या संघर्षात संतुलन साधण्याचा प्रयत्न करते.

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि अमित मसुरकर निर्मित या चित्रपटामध्ये शरत सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज काबी यांच्या दमदार भूमिका आहेत. जून 2021 मध्ये शेरनी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago