क्राईम

भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे लग्न लावून देण्यासाठी त्या दोघांचे कुटुंबीय तयार होते. परंतु, हे दोघे अल्पवयीन असल्यामुळे मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. त्यावरून या मुला-मुलीमध्ये वाद झाला आणि या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलाने मुलीला फोन केला होता आणि तो आत्महत्या करणार असल्याचे तिला सांगितले होते. त्यानंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या मैत्रिणीला त्याचा फोटो पाठवला आणि आत्महत्या केली.

हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. मुलाचा मृतदेह जेव्हा गावात आणला गेला, तेव्हा वाद सुरु झाले. गावकऱ्यांनी मुलाच्या आत्महत्येला मुलगी आणि तिची आई जबाबदार असल्याचे म्हणत त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी त्या दोघींना मारहाण केली आणि मुलाच्या मृतदेहाशेजारी आणून बसवले. त्यानंतर मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुलगा आत्महत्या करीत असल्याचे मुलीला माहित होते. त्या मुलीकडे मुलाच्या आईचा फोन नंबर देखील होता. मात्र, तरीही तिने मुलाच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली नाही. तिने वेळीच याबाबत मुलाच्या कुटुंबीयांना सांगितले असते तर त्यांनी मुलाला वाचवले असते.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलीच्या आईने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लवकरच दोषींना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

खळबळ! अल्पवयीन मुलीचा वृद्धाने घरात घुसून केला विनयभंग

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

18 तास ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago