क्राईम

महिलेने पतीची हत्या करून दिरासोबत ठेवले अनैतिक संबंध, नंतर दिराची केली हत्या, त्यानंतर…

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथे एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने अगोदर दिरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, त्यानंतर दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले. मात्र, काही काळाने दिरासोबत भांडण झाल्यानंतर तिने दिराचा देखील खून केला.

दोन दिवसांपूर्वी भोपाळच्या कोलार पोलिस स्टेशन भागात डुक्कर एक मृतदेह खात होते. अशा प्रकारे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिस तपासात मृताच्या वहिनीनेच त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीला हे कळताच त्याने विरोध केला. त्यामुळे या महिलेचा राग अनावर झाला आणि तिने दिराच्या मदतीने तिच्या मुलांसमोरच पतीची हत्या केली. यानंतर दोघांनीही कोणताही पुरावा न ठेवता घराच्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह लपविला. त्यानंतर या दोघांनीही जवळपास 5 वर्षे ही गोष्ट लपवली आणि अनैतिक संबंध सुरु ठेवले. या महिलेने आपल्या मुलांसमोरच पतीचा खून केला होता. त्यानंतर महिलेने या दोघांनीही धमकी दिली होती की जर त्यांनी याबाबत कोणाला सांगितले तर ती त्यांना देखील ठार मारेल. या प्रकारामुळे मुलांना खूप भीती वाटली होती, त्यामुळे त्यांनी 5 वर्षे तोंड उघडले नाही.

भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…

पोलिसांनी आरोपी महिलेच्या घरात बांधलेली सेप्टिक टाकी खोदली. तेव्हा त्यात एक नर सांगाडा आढळला. पोलिसांनी हा सांगाडा डीएनए चाचणीसाठी पाठविला आहे.

महिलेचे तिच्या दिरासोबत लग्न न करण्यावरून खटके उडत होते. त्यामुळे त्यांच्यात भांडण व्हायचे. तो तिला मारहाण देखील करत होता. त्यामुळे आरोपी महिलेने तिच्या दिरालाही ठार मारले. आरोपी महिलेला 14 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा मुलगा आहे. पोलीसांनी या दोन्ही मुलांनाही आरोपी ठरवले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago