मुंबई

मेट्रोच्या 2A आणि मेट्रो 7 चाचणीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यावेळी म्हणाले कि, “आजचा क्षण ऐतिहासिक आहे. 2014 मध्ये पहिली मेट्रो सुरु झाली होती, त्यानंतर लगेच आपण मेट्रो 2A आणि मेट्रो 7 कडे वाटचाल करत आहोत. दोन्ही मेट्रो मार्गावर दररोज एकूण 12 लाख प्रवासी प्रवास करु शकतील. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 25 टक्क्याने कमी होईल. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा सुरु करण्यात येईल, जो 20 किमी असेल. उर्वरित टप्पा जानेवारी 2022 मध्ये सुरु केला जाईल. या मेट्रोला चालकाची गरज नाही, मात्र सुरुवातीला काही दिवस चालक असेल.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago