तंत्रज्ञान

महत्वाचे..! मोबाईलचा वापर करताना ‘या’ चूका कटाक्षाने टाळा… नुकसान टाळा

नवी दिल्ली : मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे फोनच्या बॅटरी अधिक गरम होते. बऱ्याचदा त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याच्या देखील घटना घडतात. या चुका टाळून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.

या चुका टाळा :

  1. चार्जर खराब झाल्यावर आपण पैसे वाचवण्यासाठी डुप्लिकेट चार्जरचा वापर करतो. यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो. यामुळे फोनचा चार्जिंग प्वाइंट देखील खराब होतो. त्यामुळे फोनच्या ओरिजनल चार्जरचा वापर करावा.
  2. अनेकजण कार चार्जरचा वापर करतात. मोबाइलला कार चार्जरद्वारे चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. कार चार्जर ऐवजी पॉवर बँकचा उपयोग करणे हा चांगला पर्याय आहे.
  3. फोन अनेकदा गरम होतो, अशावेळी स्विच ऑफ करायला हवा. पुन्हा सामान्य तापमानवर आल्यानंतर त्याचा वापर करावा.
  4. फोनची बॅटरी खराब झाल्यास डुप्लिकेट बॅटरी वापरू नये. यामुळे फोन खराब होतो.
  5. अनेकदा आपण झोपताना उशी खाली मोबाइल ठेवून झोपतो. यामुळे फोनचे तापमान अधिक वाढते व फोन गरम होतो. हे बॅटरीवर अधिक ताण पडल्याने होते. अशात फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.
  6. रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असेल तर त्वरित बंद करा.
  7. झोपताना उशी खाली मोबाइल ठेवू नका. यामुळे बॅटरीवर अधिक ताण पडतो आणि फोनचे तापमान वाढते.
  8. सुर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवून फोन चार्ज करू नये. यामुळे फोन गरम होतो व स्फोट होण्याचा धोका असतो.
  9. चार्जर नेहमी सॉकेटमध्ये लावून ठेवू नये. आवश्यक असेल तेव्हाच ते सॉकेटमध्ये लावावे.
  10. फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलू नये किंवा फोनचा वापर करू नये.
  11. बॅटरी गरम करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे चार्जिंग करताना फोनचा कव्हर तसाच ठेवणे. त्यामुळे उष्णता फोनच्या कव्हरमध्ये अडकते आणि बॅटरी देखील गरम होते.

सर्वसाधारण नियम म्हणजे महिन्यातून फक्त एकदा बॅटरी पूर्णपणे (१००%) चार्ज करा. दररोज 20% आणि 80% दरम्यान ठेवा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago