मनोरंजन

अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा समृद्धी महामार्गावर अपघात

मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात काल (२४ मार्च) घडला असून त्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सोनाली आणि तिचा भाचा दोघांनाही तातडीने नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ४८ ते ७२ तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहेत. ही बातमी कळताच, सोनू सूद ताबडतोब नागपूरला रवाना झाला.​ आज सकाळी सोनू सूद आपल्या पत्नीला भेटण्यासाठी नागपूरला पोहोचला.

सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते, ती सोनू सूदच्या सामाजिक कार्यांमध्ये मदत करते. सोनू सूद आणि सोनाली यांचा १९९६ मध्ये विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांची नावे अयान व इशांत आहेत. सोनाली सूद तेलुगू भाषिक असून ती आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. नागपूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सोनालीने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago