अर्थकारण

ब्रेकिंग! रिझव्‍‌र्ह बँकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का, कर्ज महागणार

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी ४ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

रेपो रेट वाढण्याचे एक कारण म्हणजे देशात महागाई प्रचंड वाढली आहे. कारण भारतातील किरकोळ महागाई मार्चमध्ये 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, ज्यामुळे अन्न आणि उत्पादित वस्तूंच्या किमतींमध्ये अपेक्षेपेक्षा तीव्र वाढ झाली आहे, असे अधिकृत आकडेवारी दर्शवते. जे आता सलग तिसऱ्या महिन्यात RBI च्या 6% च्या सहनशीलतेच्या वर आहे. दरम्यान, ८ एप्रिल २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र महागाईवर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले होते.

पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईने उसळी घेतली आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला आहे. महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो १३.११ टक्के इतका होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago