महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याने भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणारा एक कंटेनर एक्सप्रेस वेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

कंटेनर पुलावरून कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यानंतर आसपासच्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, जखमी असलेल्या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago