Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
नवी दिल्ली : आपण अधिकाधिक परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर भारतीय टपाल विभागाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत गुंतवणूकदाराने दररोज १०० रुपयांची गुंतवणूक केली तर मुदतपूर्तीवेळी या योजनेतून गुंतवणूकदाराला पाच लाख रुपये मिळू शकतात.
पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर चांगले व्याज आणि खात्रीशीर परतावा मिळतो. ही योजना ठेवीप्रमाणेच आहे. मात्र पैसे गुंतवण्यास यामध्ये सुविधा आहे. ठेवीमध्ये एकदाच पैसे गुंतवले जातात. तर या योजनेत एक निश्चित रक्कम गुंतवून त्यावर व्याज मिळवू शकता. या खात्यात गुंतवणूक केल्यास त्यावर ५.८ टक्के व्याज मिळते. तिमाही स्तरावर व्याज दिले जाते आणि पुढे ते चक्रवाढ पद्धतीने मिळते.
या योजनेतील परताव्याविषयी कोणतीही जोखीम नाही आणि त्यातून खात्रीशीर परतावा मिळतो, कारण पोस्टाची ही गुंतवणूक योजना भांडवली बाजाराशी संलग्न नाही. रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये दरमहा किमान १०० रुपये गुंतवणूक करून सुरु करता येते. तर त्यात १० रुपयांच्या पटीत गुंतवणूक वाढवता येऊ शकते. यात कमाल गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. दरम्यान, या योजनेत दररोज १०० रुपये याप्रमाणे सलग १० वर्षे गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीवेळी पाच लाख मिळू शकतात.
दररोज १०० रुपये या प्रमाणे महिन्याला ३००० रुपये जमा होतील. यावर दर तीन महिन्याला व्याज मिळेल आणि एकूण गुंतवणूक ३.६० लाख रुपये होईल. त्यावर १.४० रुपये व्याज जमा झालेले असेल. अशा प्रकारे तुम्ही दररोज १०० रुपये रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये १० वर्षे गुंतवले तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळू शकतात. रिकरिंग डिपॉझिट स्कीमचे एकापेक्षा जास्त खाते सुरु करता येऊ शकतात. या योजनेत कुटुंबाला किंवा संस्थेला खाते सुरु करता येत नाही. एक व्यक्ती किंवा दोन व्यक्ती मिळून संयुक्त खाते सुरु करता येऊ शकते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…