अर्थकारण

एटीएममधून फाटलेली नोट मिळाल्यास काय करावं? जाणून घ्या…

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढल्यानंतर बर्‍याचदा आपल्याला फाटलेल्या नोटा मिळतात. जर ती नोट बाजारात चालवणे अवघड झाले आणि ती कोणीही घेत नसेल तर ती घेऊन बँकेत जावं लागतं. परंतु बर्‍याच वेळा बँकाही ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. पण असे झाल्यास आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने याबाबत लोकांच्या समस्या लक्षात घेऊन या समस्येचे निराकरण करण्याचा एक मार्ग शोधला आहे.

नियमांनुसार, एटीएममधून निघालेली फाटलेली नोट घेऊन आपण थेट बँकेत जाऊ शकता, तिथे बँकेच्या कर्मचार्‍यांना सांगा की ही नोट तुमच्या एटीएममधून निघाली आहे आणि तुम्ही ती बदलून घेऊ शकता. असे करून देखील बँक आपली नोट घेत नसेल तर आपण दुसरी पद्धत देखील अवलंबू शकता.

तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि संपूर्ण तपशील द्यावा लागेल

तुम्हाला एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल, तर ग्राहकाला बँकेकडून एक फॉर्म घ्यावा लागेल आणि एक्सचेंजसाठी तो माहिती भरून जमा करावा लागेल. यामध्ये तुम्हाला पैसे काढल्याची वेळ, तारीख व कोणत्या एटीएममधून पैसे काढले, त्याचा तपशील द्यावा लागेल. यासह तुम्हाला पैसे काढल्याची स्लिपही द्यावी लागेल. जर एटीएममधून स्लिप बाहेर पडली नसेल तर आपल्याला आपल्या मोबाइलवर आलेला मेसेज जोडून द्यावा लागेल.

रिझर्व्ह बँकेच्या एक्सचेंज करन्सी नियम 2017 नुसार जर तुम्हाला एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल तर ती नोट बदलून देणे ही बँकेची जबाबदारी आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, ग्राहकाला कोणतीही बँक एटीएममधून मिळालेली फाटलेली नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. यानंतरही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँकेतील कर्मचार्‍यांवर कारवाई होऊ शकते. त्याबरोबरच बँकेला 10,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago