अर्थकारण

डिजिटल पेमेंट करताय? फसवणूक टाळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्यानंतर देशात यूपीआय पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स आणि मोबाइल बँकिंग यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज प्रत्येकजण स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करीत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे देणे सोपे झाले आहे. परंतु, ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत: जागरूक राहणे. जर ग्राहक थोडेसे जागरूक राहिले, तर त्यांनी कष्टाने कमावलेले पैसे गमावल्यास ते टाळू शकतात.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :

  1. आपला ओटीपी कोणत्याही कामासाठी इतर कोणालाही देऊ नका.
  2. असा कोणताही क्यूआर कोड नसतो, ज्यामुळे पैसे मिळवता येतील.
  3. सोशल मीडियावरील मित्रांशी गप्पा मारताना आपली वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.
  4. कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर पेमेंट करण्यापूर्वी त्यांच्या अटी, खासगी धोरण, त्यांची संपर्क माहिती आणि परतावा धोरण (refund policy) काळजीपूर्वक वाचा. तसेच कॉल करून चेक करा की वेबसाइटची सपोर्ट सिस्टम कशा प्रकारची आहे.
  5. कॉल करण्यासाठी कोणत्याही बँक किंवा वॉलेटचा हेल्पलाइन नंबर Google वर शोधू नका. बँकेच्या किंवा वॉलेटच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तेथील संपर्क माहितीमधूनच नंबर घ्या.
  6. सरकारी योजनांशी संबंधित कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका. माहिती मिळविण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइटवर जा आणि तेथे नोंदणी करा.
  7. अशी कोणतीही बँकिंग योजना नाही, ज्यात एक ते तीन वर्षांत पैसे दुप्पट होतात, हे लक्षात ठेवा. नवीन योजनेत पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराचा परवाना आणि आरबीआय पॉलिसी नक्की तपासा.
  8. नेहमी Play Store आणि संबंधित वेबसाइट वरूनच कोणतंही अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. मोबाइल आणि सिस्टमच्या फीचर्सचा ऍक्सेस देण्यापूर्वी पॉलिसी वाचा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago