क्राईम

देश हादरला! भरदिवसा गळा कापून तरुणाची निर्घृण हत्या, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आणि…

राजस्थान : उदयपूर शहरात मंगळवारी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या मालदास स्ट्रीट परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी तरुणाचा मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे.

या तरूणाने भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर उदयपूरच्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून सर्वत्र या गोष्टीची निंदा होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

तरुणाला सतत धमक्या मिळत होत्या
उदयपूरच्या धनमंडी परिसरात एका दुकानात घुसून सुप्रीम टेलरचा मालक कन्हैया लाल साहू याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृताने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. यानंतर दोन तरुण त्याला सतत धमक्या देत होते. काही दिवसांपासून या तरुणाने दुकानही उघडले नव्हते, मात्र मंगळवारी दुकान उघडले असता कपडे शिवण्याच्या नावाखाली दोन जण आले. यादरम्यान कपड्यांचे मोजमाप करत असताना त्यांनी तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

काही दिवसांपूर्वी या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन एका विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात नाव नोंदवले होते. सततच्या धमक्या मिळाल्याने कन्हैयालाल घाबरला होता. त्याने पोलिसांकडे संरक्षणासाठी आवाहन केले पण पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. कन्हैयालाल यांनी धनमंडी पोलीस ठाण्यात माहिती देऊन सुरक्षेची मागणी केली. असे असतानाही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी कन्हैयालालला सुरक्षा पुरवली असती किंवा धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली असती तर कन्हैयालालला जीव गमवावा लागला नसता. या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या घटनेचा लाइव्ह व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते आरोपी टेलरची निर्घृण हत्या करताना दिसत आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु संतप्त लोक आपल्या मागण्यांसाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी आंदोलन करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्दयी खून झाला आहे, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. सध्या मृतदेह जागीच पडून आहे. जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास विविध संघटनांच्या लोकांनी नकार दिला आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago