उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा छळ केला, त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि सासरा या तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मृत महिलेचे नाव रिया जैन असून तिचा पती आकाश त्यागी, त्याची आई उषा आणि वडील सुरेश त्यागी यांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ विहार भागात राहणाऱ्या आकाशचे रियावर प्रेम होते. १० महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर आकाश आणि त्याच्या घरच्यांनी हुंडयासाठी रियाचा छळ करण्यास सुरुवात केली. मात्र, रियाने तिच्या माहेरी हुंड्याबाबत सांगणार नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर आकाशने घरातच अतिशय निर्घृणपणे रियाची हत्या केली आणि आपल्या आई-वडिलांसमोरच त्याने रियाचे शीर धडावेगळे केले. रियाचे शीर नदीत फेकण्यात आले तर धड मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलात फेकण्यात आले.
आकाश आणि त्याच्या घरच्यांनी हे भयंकर कृत्य केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रियाच्या अपहरणाचा बनाव रचला. आकाशने पोलिसांना फोन करून पत्नी रियाचे अपहरण झाल्याचे सांगितले. रियाच्या भावाने कुणाकडून तरी पैसे घेतले होते, त्याच्या वसुलीसाठी काही गुंडांनी रियाचे घरातून अपहरण केले आहे, असेही आकाशने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस तात्काळ आकाशच्या घरी पोहचले.
पोलिसांनी सांगितले की तपास करत असताना त्यांना माहितीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. पोलिसांना हा नियोजित खून आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा मार्ग असल्याचा संशय आला, मग पोलिसांनी टेहळणी व गुप्तचर पथकाची मदत घेतली. पोलिसांनी आकाश आणि त्याच्या आईवडिलांची कसून चौकशी केली. त्यानंतर तपासादरम्यान घरच्यांनीच हा गुन्हा केल्याचे समोर आले. रियाचा मोबाइल आणि आरोपीची स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे. रियाचे धड पोलिसांच्या हाती लागले असून शीर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…