क्राईम

भयंकर कृत्य! पत्नीने प्रियकराच्या मदतीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट

उत्तर प्रदेश : एका पत्नीने तिच्या पतीवर अत्याचार करत पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने तिच्या प्रियकराची मदत घेत हे भयंकर कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने प्रियकराच्या सोबतीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. दरम्यान, याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांसह घटनास्थळी पोहोचून तरुणाची सुटका केली. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण बरौत नगरमधील गुराणा रोडचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील पीडित तरुण एका विशिष्ट समाजातील असून, चार वर्षांपूर्वी कोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या तरुणीशी त्याचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी महिलेचे दुसऱ्या वर्गातील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. वारंवार समजावून सांगितल्यानंतरही पत्नीने तरुणाचे म्हणणे ऐकले नाही. त्यानंतर तरुणाने १९ जून २०२० रोजी बागपत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्याची विनंती केली, परंतु याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी तरुणाने आपल्या पत्नीला या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पहिले, त्यानंतर तरुणाने या प्रकाराला विरोध केल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला ओलीस ठेवले आणि अनेक दिवस मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago