Two arrested in Udaipur murder case
राजस्थान : उदयपूरमध्ये एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलीस हाय अलर्टवर असून शांतता राखण्यासाठी जिल्ह्यात पुढील २४ तास इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैया लालवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर दुसऱ्याने त्याच्या मोबाइल फोनवर हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आणि हत्येची कबुली दिली. हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…