Man raped ex-wife by taking her to forest after killing her husband
छत्तीसगड : सुरगुजा जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत एका गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा पूर्वाश्रमीचा पती असल्याचे निष्पन्न झाले असून, तो लग्नानंतर तिचा छळ करत असल्याने महिलेने त्याला सोडले होते. त्यामुळे आरोपीचा तिच्यावर राग होता. दरम्यान, ही महिला आसाराम यादवसोबत पत्नी म्हणून राहत होती. त्यामुळे आरोपीने सूडबुद्धीने महिलेच्या पतीवर आणि तिच्या मुलावर हल्ला केला, त्यानंतर महिलेला जबरदस्तीने आपल्यासोबत दुचाकीवर जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला. एसपी भावना गुप्ता यांनी मंगळवारी खुनाचा खुलासा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम यादव (३०), त्यांची पत्नी उर्मिला आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा हे तिघे अंबिकापूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थोर गावात राहत होते. दरम्यान, रविवारी रात्री उर्मिलाच्या पूर्वाश्रमीच्या पतीने त्यांच्या घराचा दरवाजा उघडून तिच्या पती व मुलावर जीवघेणा हल्ला केला, त्यानंतर उर्मिलाचे अपहरण केले. आसाराम यादव यांचा सोमवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी मुलाला रायपूरला रेफर करण्यात आले आहे. आसारामची अपहृत पत्नी उर्मिलाचा मृतदेह जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर असलेल्या उदयपूर परिसरातील मुटकी जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
दुहेरी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सुरगुजा एसपी भावना गुप्ता यांनी तपास पथक तयार केले होते. एसपी भावना गुप्ता यांनी सांगितले की, लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कोरजा येथील राकेश राजवाडे उर्फ जग्गू याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगार राकेश हा जुना बदमाश आहे. त्याचा भाऊही तुरुंगात आहे. राकेशचा उर्मिलाशी ४-५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, सततच्या मारहाण आणि अत्याचारामुळे ती राकेशला सोडून आसाराम यादवसोबत पत्नी म्हणून राहत होती. राकेशला सोडून देण्याच्या वैमनस्यातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. राकेश राजवाडे याने उर्मिलाच्या घराचा दरवाजा उघडून तिच्या पती व मुलावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर आसाराम यादव यांच्या मोटारसायकलवरून गुन्हेगार उर्मिलाला बळजबरीने उदयपूरच्या जंगलात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार करून तिचीही हत्या केली. सोमवारी तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहत होते. मृत आसाराम हे रामानुजगंज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कार्यरत होते. सध्या पोलिसांनी आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…