wife murdered sleeping husband by pouring boiling sugary water on him
बिहार : बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा मृतदेह छताच्या हुकला लटकवला. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ऑम्लेट बनवण्यास सांगितले पण जेव्हा तिने ऑम्लेट बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने हे भयंकर कृत्य केले. आरोपीचे नाव अजित सिंह असून, तो निवृत्त उपनिरीक्षक (Retired sub inspector) राम विनय सिंह यांचा मुलगा आहे.
राम विनय यांच्या जबाबावरून सीतामढी पोलिसांनी त्यांचा मुलगा अजित विरोधात एफआयआर नोंदवली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा सहियारा पोलीस स्टेशन हद्दीतील बेल्ही जय राम गावातील आहे. आरोपी सध्या फरार आहे. राम विनय सिंह यांनी सांगितले कि, “त्यांचा मुलगा मद्यपी आहे. तो गुरुवारी संध्याकाळी दारूच्या नशेत घरी आला. त्याने बाजारातून अंडीही आणली होती. त्याने पत्नी नीतू सिंह (३०) यांना ऑम्लेट बनवण्यास सांगितले, मात्र नितु यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या की, गुरुवारी स्वयंपाकघरात मांसाहार बनवता येणार नाही. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.
आरोपीची पत्नी नीतू त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे रागावली होती. यापूर्वीही तिने त्याला दारू पिण्यास विरोध केला होता आणि गुरुवारीही तिने असेच केले. यामुळे अजित संतापला. त्याने प्रथम बेडरूममध्ये तिला मारहाण केली, नंतर तिचा गळा दाबून तिला फाशी दिली. काही वेळाने नीतूने ओरडणे थांबवले, तेव्हा राम विनय यांना वाटले की भांडण थांबले आहे. मात्र काही वेळाने अजित खोलीतून बाहेर आला आणि पळून गेला. राम विनय यांनी खोलीत बघितले तर त्यांची सून नीतू छताच्या हुकला लटकलेली होती. त्यानंतर राम विनय यांनी मुलगा अजित विरोधात एफआयआर नोंदवली. आरोपी अद्याप फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…