क्राईम

नात्याला काळिमा! जन्मदात्या पित्याने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला नंतर तिला विकले…

उत्तर प्रदेश : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदामध्ये घडली आहे. एका मद्यपी पित्याने आधी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला एका व्यक्तीला 60 हजार रुपयांना विकले. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. दरम्यान, पीडित मुलीला कुठूनतरी तिच्या मामाचा नंबर मिळाला, त्यानंतर तिने तात्काळ मामाला फोन केला. मामाने पोलिसांना माहिती देऊन मुलीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांना दिलेल्या जबानीत मुलीने तिचे वय 18 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले. दोन वर्षांपूर्वी एके दिवशी तिच्या वडिलांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी वडिलांनी तिला वीटभट्टीच्या बुककीपरला 60 हजार रुपयांना विकले. तेव्हापासून ती त्या व्यक्तीच्या घरी पत्नी म्हणून राहत होती. मुलीने सांगितले की, तिने कालिंजर येथे राहणाऱ्या तिच्या मामाचा नंबर एका ओळखीच्या व्यक्तीकडून मिळवला, त्यानंतर तिने तिच्या मामाला सर्व प्रकार सांगितला. मामाने पोलिसांना कळवले आणि तिची सुटका होऊ शकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेशातील छतरपूर येथील रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब बांदा येथील एका वीटभट्टीवर काम करतात. पीडितेने सांगितले की, तिच्या वडिलांनी मुनीमकडून आगाऊ पैसे घेतले होते. मात्र, नंतर पैसे फेडता न आल्याने त्याने स्वतःच्या मुलीला विकले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आपल्या लहान मुलाला फतेहपूर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाला अवघ्या 6,000 रुपयांना विकले होते. हा मुलगा फक्त नऊ वर्षांचा आहे. त्याला त्या कुटुंबाने घरगुती कामासाठी नेले. आरोपीने लहान मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिची किंमत चांगली नव्हती, त्यामुळे तो विकू शकला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितले की, तिच्या आईलाही याबद्दल माहिती होती. पण तिने कधी विरोध केला नाही. तिचा एकुलता एक भाऊ वडिलांनी विकला, तरीही आई गप्प राहिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्या आईने सांगितले की, गरिबीमुळे तिने कधी तोंड उघडण्याचे धाडस केले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago