क्राईम

काँग्रेस नेत्यासह 6 जणांकडून अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

छत्तीसगड : छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाहनवाज याच्यासह तिघांना अटक केली आहे. महेंद्रगड अंतर्गत येणाऱ्या चिरमिरी शहरात ही घटना घडली. या शहरातील अल्पवयीन मुलीला काँग्रेस नेते शाहनवाजसह सहा जणांनी चार महिन्यांपूर्वी बिलासपूर येथील हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेले होते. तेथे सर्वांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

त्यादरम्यान या अल्पवयीन मुलाने भीतीपोटी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, आता पीडितेच्या तक्रारीच्या आधारे चिरमिरी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 363, 366ए, 376डी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 46 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कलमांखाली एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी शाहनवाज आणि इतर तीन आरोपींना अटक केली. त्याचबरोबर दोन गुन्हेगार अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago