क्राईम

बीटेकच्या विद्यार्थ्याची महाविद्यालयात चाकूने भोसकून हत्या, आरोपींना अटक

लखनौ : एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी एका बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बागपतच्या बरौत भागातील शिकोहपूर गावात राहणारा निखिल तोमर मेरठमधील एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेक मेकॅनिकलचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वी निखिल आणि त्याच्या काही मित्रांचा कॉलेजमधील इतर काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता. बुधवारी सकाळीही निखिलचा त्याच विद्यार्थ्यांशी वर्गात प्रवेश करण्यावरून वाद झाला. त्यानंतर हा वाद चिघळला आणि आरोपी विद्यार्थ्यांनी मिळून निखिल आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी निखिलवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, दोन आरोपी विद्यार्थी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले. घटनेनंतर तात्काळ निखिलला सुभारती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना ताब्यात घेतले. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago