Zomato delivery boy was attacked and robbed
पुणे : पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला करून त्याला लुटले. ही घटना निकमार कॉलेज हॉस्टेल, बालेवाडीचे गेट नं. 2 जवळ रस्त्यावर काल (१२ एप्रिल) दुपारी २. २० वाजता घडली. याप्रकरणी डिलिव्हरी बॉयने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटो डिलिव्हरी बॉय सौरभ गंगणे, (वय-21, रा. शास्त्रीनगर, काळेवाडी, पुणे) हा झोमॅटोची डिलिव्हरी देवुन परत जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सौरभला थांबवले. नंतर त्यांची गाडी आडवी लावून सौरभच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार करून त्याच्या खिशामधील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले, त्यामधील 1,700 रूपये, बँकेचे एटीएम कार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे तसेच एक 5,000 रुपयांचा मोबाईल, सॅकमधील मोबाईलचा चार्जर, ब्ल्युटुथ असा ऐवज जबरदस्तीने चोरी करून नेला.
डिलिव्हरी बॉय सौरभ गंगणे याने याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…