महाराष्ट्र

फ्रीजने पेट घेतल्याने वाड्याला आग लागली, अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे…

आळंदी : खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथे घरातील फ्रीजने पेट घेतल्याने संपूर्ण वाड्याला आग लागली. ही दुर्घटना मंगळवारी (१२ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यात वाड्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत जवळपास तीन सिलिंडरचा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, माउलींच्या मंदिरापासून जवळच जुन्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इमारतीजवळ असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर धर्मशाळाजवळ राहणाऱ्या मुकुंद क्षीरसागर यांच्या घरात ही दुर्घटना घडली. फ्रीजला मागच्या बाजूला आग लागली होती, ती नियंत्रणात आणत असताना लाकडी घराच्या वाशांनी पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. यात घरातील साहित्य आणि त्याबरोबरच रोख रक्कम देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तेथे दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहता पालिकेने चाकण नगरपरिषद, पीएमआरडीए यांच्या अग्रिशामक गाड्या बोलावल्या होत्या. परंतु, आग लागलेला वाडा अरुंद बोळीत असल्याने अग्निशामक बंब तिथे पोहोचू शकला नाही. शेवटी बाह्य रस्त्यावर गाड्या उभ्या करून पाइपद्वारे पाणी मारण्यात आले आणि अथक परिश्रम घेत आग विझवण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago