देहरादून : उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमधून मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील किच्छा येथे चुलत भावानेच आपल्या तीन वर्षांच्या बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी तीन वर्षांची चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. तिचे वडील खासगी शाळेच्या बसचे चालक असून आईही मजूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी तिचे वडील आणि आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मुलगी इतर मुलांसोबत खेळत होती. यादरम्यान मुलीचा चुलत भाऊ दुचाकीवरून तेथे आला आणि मुलीला घेऊन गेला. आई-वडील परत आल्यावर मुलगी बेपत्ता असल्याचे पाहून त्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी दुचाकीस्वार आलेल्या तरुणाची माहिती दिली. लोक त्या तरुणाचा शोध घेऊ लागले. मात्र आरोपी तरुण याबाबत अनभिज्ञ होता.
त्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आईला अटक केली. कठोरपणे चौकशी केली असता आरोपीने सांगितले की, त्याने मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने त्याच्या पालकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली, त्यानंतर आरोपीच्या पालकांनी आरोपीला पळून जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…