An eight-year-old girl was raped and brutally murdered in Bihar
बिहार : बिहारमधील मुंगेर येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नराधमांनी मुलीचा एक डोळा देखील फोडला. तसेच या मुलीच्या हाताची बोटंदेखील ठेचण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सफिया सराय स्टेशन क्षेत्रातील पुरवारी टोला फरदा गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली आपल्या वडिलांसोबत गंगा घाटावर आली होती. काही वेळाने वडिलांनी मुलीला घरी जाण्यास सांगितले आणि ते मासेमारी करण्यासाठी तेथून निघून गेले. इकडे बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली, त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. परंतु, ही चिमुकली सापडली नाही.
गुरुवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह गावकऱ्यांना गावाजवळच एका झाडाखाली आढळला. छिन्न-विछिन्न अवस्थेत असलेला तिचा मृतदेह पाहून काळजाचा थरकाप उडत होता. गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होऊ शकते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. बलात्काराचा पुरावा मिटवण्यासाठी तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…